satyaupasak

Manoj Jarange Patil: धनंजय देशमुखांना धमकी प्रकरणावर संताप; मनोज जरांगे म्हणाले, “धनुभाऊंचा उल्लेख असा का?”

Manoj Jarange Patil: माझ्यावर कितीही केसेस दाखल केल्या तरी मी न्याय देणार, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
Manoj Jarange on Dhananjay Munde: बीडच्या मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर मनोज जरांगे पाटील यांचा संताप व्यक्त

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, धनंजय देशमुख यांना तुम्ही धमक्या देता आहात. गुंडाला बोललो तर तुम्ही मला जातिवाद म्हणता आहात. मी समाजासाठी आलो आहे. गरीबांच्या लेकरांना न्याय देण्यासाठी मी बोलतोय, समाज बोलतोय. मंत्र्यांना नाही बोलायचं तर मग कोणाला बोलायचं? आम्ही आमच्या समाजाच्या नेत्याला बोलत नाही का? धनंजय मुंडे त्यांना वाचवण्यासाठी षड्यंत्र रचत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडे चुकीचा पायंडा पाडत आहेत
त्यांनी ओबीसीचं पांघरूण घेऊ नये, स्वतः पाप करायचं, त्यांचा समाज यामध्ये अजिबात नाही. आरोपींच्या बाजूने बोलतात, आरोपींना साथ देतात. मंत्र्यांना बोलू नका, तुमचा काय संबंध आहे? गावात फिरू देणार नाही, रस्त्यावर फिरू देणार नाही, हे मंत्र्यांनाच सांगावं लागतं. आमच्या समाजाच्या मंत्र्याला बोलल्यावर आम्ही पण तसंच करायचं का? धनंजय देशमुख न्यायासाठी वणवण फिरत आहे. त्याला पोलीस स्टेशनला जाऊन धमक्या देत आहात. त्या गुंडाला बोलायचं नाही का? तुमचा नेता नाही, तो सरकारमध्ये आहे. यात जातीचा काय संबंध? ओबीसीचा काय संबंध? मी वंजारी, धनगर, दलित, ओबीसीचं नाव घेतलं का? लोक कापायचे आहेत का तुम्हाला? धनंजय देशमुख यांना धमकी दिली, तेव्हा मी धन्या मुंडेचं नाव घेतलं. तू माझ्या नादी लागू नको. माझ्यावर हजारो केसेस केल्या तरी मी न्याय करणार आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तर धनंजय मुंडे चुकीचा पायंडा पाडत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *